Advertisement
- संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी घेतला निर्णय
- परिषदेची शिस्ती मोडणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा
- सोलापुरात होणारी राज्यस्तरीय बैठक पुण्यात घेत केले महत्त्वापूर्ण बदल
- राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
सोलापुरातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा.
लक्ष्मणराव ढोबळे यांनी राज्यातील राजकारणात "वाणी चातुर्या'ने स्वतंत्र स्थान
निर्माण केले आहे. वंचीत समाजाचे असले तरी "लोकनेते' म्हणून ते जनमाणसांत अधिक
प्रचलित आहेत, त्यांचा एक "शब्द' कोणतीही निवडणूक फिरवू शकतो. याच कारणामुळे
त्यांचा सोलापुरातच नव्हे तर राज्यात बहुजन समाजात त्यांचा आदरयुक्त दरारा आहे.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी वंचित आणि बहुजनांच्या हक्काचे
रक्षण करण्याकरिता त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी "बहुजन रयत परिषद'
या सामाजिक संघटनेची स्थापना केली. गेल्या चार दशकांत राज्यात अनेक छोटे-मोठे
राजकीय पक्ष आले आणि गेले तसेच काही संघटना निवडणुकीच्या काळात उगवल्या आणि
तेवढ्याच वेगात नाहीशा झाल्या. मात्र, प्रा.ढोबळे यांनी आपल्या निष्ठावंत पदाधिकारी
तसेच कार्यकर्त्यांच्या बळावर बहुजनांच्या समस्या सोडवित, तळागळातील वंचितांच्या
न्यायासाठी लढा देत बहुजन रयत परिषदेला सातत्याने निष्ठेचे खतपाणी घातले. याच
कारणामुळे राज्यातील किरकोळ राजकीय पक्षांपेक्षाही बहुजन रयत परिषदेचे स्थान मोठे
मानले जाते. राजकीय पक्षाच्या सभासदांऐवढेच परिषदेचे सभासद आज राज्याच्या
कानाकोपऱ्यात आहेत. वंचितच नव्हे तर बहुजन समाजातील पदाधिकारी, कार्यकर्तेही या
परिषदेची ताकद ठरले आहेत. संस्थापक अध्यक्ष प्रा. ढोबळे यांनी परिषदेचे ध्येय-धोरण
ठरविताना शिस्तही लावली आहे. याच कारणास्तव परिषदेला आज राजकीय पक्षाचे स्वरूप आले
आहे. याच पार्श्वभूमीवर बहुूजन रयत परिषदेची 2021-22ची राज्यस्तरीय कार्यकारिणी
तातडीने बरखास्त करीत संस्थापक अध्यक्ष प्रा.ढोबळे यांनी सोलापुरात होणारी बैठक
पुण्यात घेत 2023ची नवी कार्यकारिणी जाहीर केली.
बहुजन रयत परिषदेची राज्य कार्यकारिणी सहकारातून, बहुमतातून निवडली जाते. 2022 पर्यंतची राज्यस्तरीय कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष प्रा.ढोबळे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष, महिला आघाडी कार्याध्यक्ष, सरचिटणीस अशा महत्त्वाच्या निवडीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मत मागविण्यात आली. यानुसार ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची राज्य कार्यकारिणीसह सर्वानुमते बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या महत्त्वाच्या पदासह अन्य पदांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या, सर्वांना एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली. परिषदेची राज्यस्तरीय 2023ची कार्यकारिणी जाहीर झाली असताना चुकीची कामे करणाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष प्रा. ढोबळे यांनी बाजुला केल्याचे तसेच काम करणाऱ्या आणि जबाबदारीची जाणीव असलेल्या कार्यकर्त्यालाच परिषदेच्या पदावर स्थान देण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची चर्चा पुण्यात झालेल्या कार्यक्रमावेळी होती.

यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई
साळुंखे-ढोबळे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेव साठे, बालाजी गायकवाड, रवींद्र वाकळे,
साहेबराव शृंगार, राजू कसबे, अजय डोंगरे, अशोक जाधव, ईश्वर शिरसागर, सिद्राम जावीर,
धनंजय जाधव, श्रीमंत गायकवाड, सुरेश पाटू, नाना जाधव, साहेबराव गुंडीले, श्री
कलवले, प्रा.कदम, राज्य संपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील, रवींद्र पाटील, महिला आघाडी
संपर्क प्रमुख मीनाक्षी सकट, बापूसाहेब गायकवाड, आबासाहेब वाघमारे, दिलीप तेलंग,
समाधान वाघमारे, अक्षय घोडके, महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष ऍड. शुभा पिल्ले,
जळगाव येथील आदरणीय साहेबांचे विश्वासू अमित पाटील, मंगळवेढ्याचे प्रकाश खंदारे,
मंगळवेढा तालुका अध्यक्ष संभाजी भोसले यासह राज्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन ढोकले सर यांनी केले तर अंबादास अहिरे यांनी आभार मानले. यावेळी राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
युवती शाखाही सुरू करणार
बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची संपूर्ण जबाबदारी सध्या त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या सांभाळत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या परिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवित आहेत. याच अनुषंगाने बहुजन रयत परिषदेच्या युवती शाखा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. ऍड. कोमलताई या सोलापूर लोकसभेसाठी किंवा पंढरपूर, मोहोळ मतदार संघातील भक्कम दावेदार मान्यल्या जात आहेत. या पार्श्वभूमीर युवती शाखांचा निर्णय राजकारणाला वेगळे वळण देणारा ठरू शकतो.
नवनियुक्तांनी घेतली शपथ
बहुजन रयत परिषदेचे कामकाज राजकीय पक्षाप्रमाणेच मोठे आहे. परिषदेतील पदाधिकारी तसेच अगदी सामान्य कार्यकर्ताही कुठल्याही भागातील चालु स्थितीतील राजकारण पलटवू शकतो. राज्यातील राजकारणात झालेल्या काही घडामोडी लक्षात घेता, यावेळी राज्यस्तरीय कार्यकारिणीसह नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांनी परिषदेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.