#

Advertisement

Monday, September 25, 2023, September 25, 2023 WIB
Last Updated 2023-09-25T13:10:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अरे चाललंय काय? उपसंचालक मिटींगमध्ये आहेत, बाहेर गेले.., मुंबईला गेले

Advertisement

बहुजन रयत परिषदेचे साहेबराव गुंडीले करणार उपोषय
खोटे अपंग प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी कार्यवाहीच नाही

लातूर : नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक विभागातून खोटे अपंग प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी कार्यवाहीबाबत दहा महिन्यांपूर्वी आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, या कामी कुठलीही कार्यवाही अद्याप करण्यात आलेली नाही. यासंदर्भात लातूर विभागातून नेमणूक केलेली चौकशी समिती अहवालाच्या अनुषंगानेही काहीही माहिती दिली जात नाही, याचा निषेध करीत आरोग्य सेवा लातूर कार्यालयासमोर दि 04/10/2023 रोजी कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे व बोंबमारो आंदोलन करणार असल्याचा इशारा बहुजन रयत परिषदेचे साहेबराव गुंडीले यांनी दिला आहे.
गेल्या 10 महिन्यांपासून दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सदर कार्यालयातील कर्मचारी यांना विचारणा केली असता उपसंचालक साहेब मिटींगमध्ये आहेत..., साहेब बाहेर गेले... मॅडम मिटींगमध्ये आहेत.., मॅडम मुंबईला गेल्या... तुमचे पत्राचे उत्तर पोस्टाने पाठविले आहे, अशी उत्तरे दिली जात असून कार्यवाही प्रकरणी टाळाटाळ केली जात आहे. बोगस खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरणाबाबत आपल्या कार्यालयातून कुठलीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे, याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच कामकाजातील पारदर्शकतेच्या मागणीसाठी लातूर आरोग्य सेवा कार्यालयासमोर बेमुदत धरणे व बोंबमारो आंदोलन करणार आहे, असा इशारा बहुजन रयत परिषदेचे साहेबराव गुंडीले यांनी दिला आहे.
लातूर आरोग्य सेवा कार्यालय उपसंचालक यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे अपंग प्रमाणपत्र धारकाची समक्ष पूर्ण तपासणी करून, दोषीवर कडक कार्यवाही करण्यात यावी, जिल्हाशल्य चिकित्सक नांदेड या विभागातून 2017 ते 2022 पर्यंत देण्यात आलेल्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची यावी, खोटे अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवर कडक कार्यवाही करण्यात यावी, टाळाटाळ करणाऱ्या कर्मचारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशा मागण्यात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कार्यालयीन वेळेत बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याने याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहील. आंदोलनाच्या वेळेत माझ्या जिवाचे काही वाईट झाल्यास यास आपण जबाबदार असाल, असेही गुंडीले यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील निवेदनाची प्रत लातूर जिल्हाधिकारी, लातूरचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.