#

Advertisement

Tuesday, September 19, 2023, September 19, 2023 WIB
Last Updated 2023-09-19T11:58:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंतप्रधान मोदी यांचे "महिला आरक्षण' निर्णयाबाबत लक्ष्मणराव ढोबळे यांनी मानले आभार

Advertisement

 


दिल्ली : नवीन संसद भवनात पहिल्या दिवसाच्या कामकाजात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महिला आरक्षण विधेयकाची जोरदार बाजू मांडली. तर, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत मांडलेले विधेयक (नारी शक्‍ती वंदन कायदा) दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आल्यानंतर कनिष्ठ सभागृह आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव असणार आहेत, या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मनापासून धन्यवाद व्यक्‍त करतो, अभिनंदन करता, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली आहे.
महिला राजकीय आरक्षणाबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर होऊन कायदा बनल्यानंतर आता लोकसभेतील महिला खासदारांची संख्या 181 होणार आहे, लोकसभेत सध्या 82 महिला खासदार आहेत. यामध्ये वाढ होणार असल्याने महिलांनाही लोकसभेत समान काम करण्याची संधी मिळणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासीक म्हणावा लागेल. नव्या विधेयकानुसार अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या जागांपैकी 33 टक्के आरक्षण उपलब्ध असेल, त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमातींसाठी 33 टक्के जागांचे आरक्षण त्या समाजातील महिलांसाठी असणार आहे. लोकसभेच्या आरक्षणाच्या जागा सीमांकनानंतर ठरणार आहेत, असेही माजी मंत्री प्रा. ढोबळे यांनी सांगितले.

कायदा झाल्यानंतर हे बदल होणार
लोकसभेतील महिलांची संख्या 181 पर्यंत वाढणार
महिला आरक्षणाचा कालावधी 15 वर्षे असणार
SC/ST महिलांसाठी जागा राखीव असतील.
भारतीय राजकारणात महिला सहभाग वाढणार.