#

Advertisement

Tuesday, September 19, 2023, September 19, 2023 WIB
Last Updated 2023-09-19T11:11:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लक्ष्मणराव ढोबळे दिल्लीत; सोलापुरात अनेकांच्या भुवया उंचावल्या

Advertisement

महाराष्ट्र सदनात दोन दिवस मुक्‍काम; राजकीय घडामोडींची चर्चा

सोलापूर : संसदेचे विशेष अधिवेशन होत असताना जुन्या संसदभवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटचे भाषण केले तर आज नव्या संसद भवनातही पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित खासदारांसह संबोधित केले. सेंट्रल व्हीस्टा प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरूवात झाली. याच कालावधीत माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे गेली दोन दिवस दिल्लीत असल्याने सोलापुरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दिल्लीत दोन दिवस सुरू असलेल्या विशेष अधिवशनासह जुन्या आणि नव्या संसद भवनातील कामकाज सुरू होताना भारतीय जनता पक्षाची काही मोजकी मंडळी दिल्लीत उपस्थित होती. याच दरम्यान माजी मंत्री तथा भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्‍ते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे ही दिल्लीत होते. महाराष्ट्र सदन भवन मधील पुतळ्यांचे दर्शन घेत असतानाचे ढोबळे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातून सोलापुरात मात्र विविध चर्चेला ऊत आला आहे.
सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेसकडून कोण आणि भाजपकडून कोण उमेदवार? अशी चर्चा टिपेला पोहचलेली असतानाच माजी मंत्री ढोबळे हे दिल्लीत सातत्याने दिसून येत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आपली मुलगी आमदार प्रणिती शिंदे हिने लोकसभा लढवावी, अशी इच्छा प्रसार माध्यमांसमोर व्यक्‍त केली आहे. सोलापुरात कॉंग्रेस आणि भाजप अशी थेट लढत लोकसभेसाठी होत असताना कॉंग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे रिंगणात उतरणार असतील तर भाजपकडून माजी मंत्री प्रा. ढोबळे यांना संधी दिली जाणार तर आमदार प्रणिती शिंदे लढणार असतील तर ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांना उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा असतानाच शिंदे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव पुढे केलेले असताना माजी मंत्री प्रा. ढोबळे दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी ते आपली कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे नाव फायनल करण्यासाठी गेले आहेत की काय? माजी मंत्री ढोबळे हे मुसद्दी नेते मानले जातात. त्यामुळे भाजपचे प्रवक्‍ते पद स्विकारले असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चांगले संबंध असलेले ढोबळे हे लोकसभेला कन्येसाठी उमेदवारी अलगद घेऊन ते केंव्हा तयारीला लागतील, हे विरोधकांना कळणार ही नाही, अशी चर्चा सोलापुरात आहे.