#

Advertisement

Tuesday, September 5, 2023, September 05, 2023 WIB
Last Updated 2023-09-05T18:03:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपच्या राज्य कार्यकारिणीत लक्ष्मणराव ढोबळे यांना स्थान

Advertisement

महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले पत्र

मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यामुळे राज्य कार्यकारिणीत कुणाला स्थान आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर होत असताना त्यामध्ये सोलापुरातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे स्थान कायम ठेवण्यात आले असून त्यांची महाराष्ट्र प्रदेश प्रवक्‍ते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रा. ढोबळे यांना दिले. भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत ढोबळे यांचे स्थान कायम ठेवण्यात आल्याने आगामी काळात त्यांच्यावर सोलापुरात मोठी जबाबदारी सोपविली जाईल, अशीही चर्चा सुरू आहे.
लोकसभेसाठी भाजपने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजप नवी टीम उभी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपच्या राज्य कार्यकारिणीत तेवढ्याच ताकदीच्या व्यक्‍तींना स्थान असणार, असे मानले जात असताना बावनकुळे यांनी सोलापुरातील प्रा. ढोबळे यांचे स्थान कायम ठेवत त्यांच्यावर प्रवक्‍ते पदाची जबाबदारी सोपविली आहे.
भाजप प्रदेश कार्यकारिणीत मोठे फेरबदल दिसणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यभरात नव्या नियुक्‍त्या करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र भाजपात मोठे फेरबदल करीत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य कार्यकारिणीत सोलापुरचे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे स्थान कायम ठेवीत आगामी काळातील राजकीय संकेत दिले असल्याचेही मानले जात आहे.