#

Advertisement

Monday, October 2, 2023, October 02, 2023 WIB
Last Updated 2023-10-02T12:44:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर लोकसभा "पॉवरफूल' नेता लढविणार?

Advertisement


राजकीय गणितं ऐनवेळी फिरणार
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच सातत्याने राजकीय हेलकावे खात आहे. 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेला हा मतदार संघ काबीज करण्यासाठी इतर पक्ष सरसावले असताना 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेकांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये आता केंद्रात आणि राज्यातील सर्वात "पॉवरफुल' नावही घेतले जावू लागले आहे. या उमेदवाराने 2009 ते 2019 एकाच मतदार संघातून लोकसभा निवडणुका लढवित त्या जिंकल्याही आहेत. परंतु, त्या मतदार संघात कुठलीही ठोस विकासकामे झाली नसल्याने तसेच दिलेली आश्‍वासनेही पूर्ण केली गेली नसल्याने त्या मतदार संघातील मतदार आता या उमेदवाराला कंटाळला आहे. याशिवाय सोलापुरातील प्रस्थापीतापुढे आव्हान निर्माण करण्यासाठी ते खुद्द सोलापूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारी असल्याची शक्‍यता चर्चेली जात आहे.
सोलापूरच्या राजकीय समीकरणात आता मोठा बदल झाला आहे. कधीकाळी एकाच पक्षाचे वर्चस्व असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघावर आता बड्या नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. सोलापूर मतदार संघाने नेहमीच नवे खासदार दिल आहेत. याच कारणातून आपला जना मतदारसंघ बदलून सोलापुरातून एक पॉवरफूल नेता लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेसच्या ताब्यात असलेला मतदार संघ भाजपने ताब्यात घेतला असला तरी हा मतदारसंघ आपला असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही केला आहे याशिवाय आरपीआय, एमआयएम, बीआरएस अशा अन्य पक्षांकडून या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारांची काही नावे पुढे आली आहेत. मात्र, पॉवरफूल नेता या मतदार संघातून लढल्यास संपूर्ण राजकीय गणिते फिरणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रही आता त्यांच्या पक्षातून सुरू झाला आहे. या पॉवरफूल नेत्याच्या सोलापुरातील संभाव्य उमेदवारीचे पडसादही राजकीय पडद्यामागे उमटू लागले आहेत. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय राजकारणातील जुना परंतु सोलापुराकरांसाठी नव्याने हा चेहरा लोसभेतून समोर येणार आहे. यामुळे आगामी एक-दोन महिन्यांत पुन्हा सोलापूरच्या राजकीय पटलावर प्रस्थापित राजकारण्यांना नव्याने डाव मांडावा लागणार आहे.