Advertisement
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना नालायक असे म्हंटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नालायक म्हणणा-या उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारनं सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका केल्याबद्दल नारायण राणेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याप्रमाणं आता शिंदेंवर टीका केली म्हणून ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतंय. याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कारवाई केली जाईल, असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दावनेंचं सरकारला आव्हान
एकीकडे उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारनं सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे सरकारमध्ये ताकद असेल तर कारवाई करावी असं आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दावनेंनी शिंदे सरकारला दिले आहे.
