#

Advertisement

Monday, November 27, 2023, November 27, 2023 WIB
Last Updated 2023-11-27T13:43:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तिरूपती बालाजीच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक

Advertisement

तिरूमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरूमलामध्ये आहेत. काल संध्याकाळी साडे सात वाजता पंतप्रधान मोदी हे रेनिगुंटा विमानतळावर उतरले. यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळावर जात मोदांचं स्वागत केलं. त्यानंतर आज मंदिरात जात बालाजीचं दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेंकटेश्वर मंदिरात गेले. दर्शन घेतलं. तिथे त्यांनी विधिवत पूजा केली. बालाजीला गेल्यानंतर नरेंद्र मोदी हे पारंपरिक वेशभूषेत दिसले. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये नरेंद्र मोदी यावेळी दिसले. या कपड्याची किनार ही नारंगी, पांढरा आणि हिरव्या रंगाची आहे. तर भगव्या रंगाचा गमछा त्यांनी परिधान केला होता. तसंच डोक्याला टिळा लावला होता. बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी देशवासीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. 140 कोटी भारतीयांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, कल्याणासाठी बालाजीकडे साकडं घातलं. तसंच देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.