Advertisement
पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या
सोलापूर : बार्शी तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीने शिक्षक पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून करुन नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. पतीदेखील स्वतः शिक्षक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे. अतुल मुंढे असं खून करुन आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अतुल हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. अतुल यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. अतुल मुंडे हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह नाईकवाडी प्लॉटमध्ये राहत होते. त्यांच्या पत्नी यादेखील शिक्षिका होत्या. आज मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अतुल मुंडे यांनी पत्नी व मुलाची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पोलिस प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
