Advertisement
प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता, परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
स्त्री शिक्षणासाठी लढा उभारणारे महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात जात प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना अभिवादन केलं. यावेळी आंबेडकर यांनी भाष्य केलं.
मुंबईमध्ये तीन दिवसापूर्वी मुस्लिम संघटना बैठकझाली. 8 डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषय आझाद मैदानावर सभा घेणार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सामान्य माणसाने विचार करायला हवा. हा मुस्लिमांचा विषय आहे. म्हणून सोडून द्यायचं, असं भाजप सांगत आहे. सरळ प्रश्न आला. सरळ उत्तर येईल. पण मला प्रश्न येईल. तसं उत्तर देणार… एकदा बोललो की, बोललेलं विधान मी कधीच मागे घेत नाही. मागे घेणार नाही. राज्यात सध्या दंगली कधीही घडू शकतात, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.