Advertisement
मुंबई : राज्यात महायुतीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तीन पक्षांत कोण किती जागा लढवणार आहे, हे निश्चित झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यानुसार राज्यात भाजप २६ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना २२ जागेवर आपले उमेदवार देणार आहेत.
०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा फार्मूला ठरला आहे. त्यानुसार भाजप २६ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी २२ जागांवर लढतील. जागावाटपाचा हा फॉर्मूला निश्चित झाला असून त्यावर लवकरच यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे,” देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला फार्मूला शिवसेना आणि राष्ट्रवादी मान्य करणार का? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान राज्यात आरक्षणावरुन तणाव निर्माण झाला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. ओबीसी आरक्षणास धक्का लागणार नाही, हे त्यांनी या मुलाखातीत पुन्हा स्पष्ट केले.