Advertisement
पहिला मुद्दा - अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केला
दुसरा मुद्दा - अजित पवार पक्षाच्या घटनेविरोधात वागले आहेत. अजित पवार घटने विरोधात कसे वागले आहेत तर ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत आणि मतदारांनी शरद पवार आणि घड्याळ हे चिन्ह पाहून मतदान केलं आहे. त्यामुळे पक्षाची आचारसंहिता अजित पवारांनी पाळली नसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
तिसरा मुद्दा - अजित पवारांनी राष्ट्रवादी कांग्रेसची मूळ विचारधारा सोडली आणि ते विरोधी विचारधारा असलेल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. या तीन मुद्द्यांचा आधार घेऊन अजित पवारांचे खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची विनंती शरद पवार गटानं केली आहे.
