Advertisement
पंढरपूर : भाजप प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे हे आज पंढरपुरात होते, त्यांनी विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेत प्रार्थना केली. काय आणि कुणासाठी प्रार्थना केली, याबाबत विचारले असता त्यांनी स्मित हास्य केले. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री भाजपा प्रवक्ते प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांचे स्वागत समिती पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुधिर घोडके व पाटिल साहेब यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी शरद अडगळे], शिवाजी घाडगे, समाधान वाघमारे, नितीन काळे अनेक मान्यवर उपस्थित होते.
