Advertisement
पुणे : दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांनाही स्वराज्य संघटनेने शासकीय विश्रामगृहात घुसून इशारा दिला आहे. गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे.
पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना चॅलेंज दिलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली आणि दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवलं. धनंजय जाधव यांनी गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराच पोलिसांसमोर दिला. ओबीसी नेत्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. छगन भुजबळ हे वारंवार वक्तव्य करून दोन समाजांमध्ये वाद लावत आहेत. त्यांनी हे वेळीच थांबवावं, असा इशारा धनंजय जाधव यांनी दिला.
