#

Advertisement

Tuesday, November 21, 2023, November 21, 2023 WIB
Last Updated 2023-11-21T13:47:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंगळवेढा येथे "अनुसंध्या' धार्मिक कार्यक्रम

Advertisement

स्व. अनुराधाताई ढोबळे यांच्या जयंती निमित्त आयोजन

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्‍ते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सौभाग्यवती स्व. अनुराधाताई ढोबळे यांच्या जयंती निमित्त ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्‍वर महाराज औमेकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिली.
शाहु शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने बहुजन रयत परिषदेतर्फे सदर "अनुसंध्या' या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम बुधवारी, ता. 29 नोव्हेंबर 2023 सायंकाळी 6 वाजता मंगळवेढा येथील शिशुविहार समोर, शाहु ग्राऊंड येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ मंगळवेढा मतदार संघातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ऍड. कोमलताई यांनी केले आहे.