#

Advertisement

Saturday, November 25, 2023, November 25, 2023 WIB
Last Updated 2023-11-25T19:30:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुण्यात बागेश्वर बाबांच्या दर्शनाला फडणवीस आणि ढोबळे एकाच वेळी...

Advertisement

पुणे : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी पुणे येथे बागेश्वर बाबांचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ढोबळे यांनी एकच दिवशी आणि एकाच वेळेला दर्शनासाठी हजेरी लावल्याने सोलापूर मतदरसंघांत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीबाबत कोणच शास्वती देऊ शकत नाही. काही कागदोपत्री प्रकरणामध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत भाजप तयार होणार नाही. या पार्शवभूमीवर भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुरातून सक्षम उमेदवाराच्या शोधत आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अगदी कमी कालावधी राहिला आहे. याच कारणातून भाजप वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सोलापुरात वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री ढोबळे यांनाही सातत्याने भेटीसाठी बोलावले जात आहे.

पुणे येथे गुरुवारी बागेश्वर बाबांच्या दरबारी हजेरी लावण्यासाठी उपुख्यमंत्री फडणवीस येणार होते, त्याच दिवशी आणि वेळेत ढोबळे हे ही उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी बाबांचे आशीर्वाद घेतले. आता,  हा आशीर्वाद नेमका कोणत्या कारणासाठी घेतला होता, याची चर्चा सोलापूर मतदारसंघात रंगली आहे.

दरम्यान, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन अंधश्रद्धा, रूढी परंपरेवर जोरदार प्रहार केलेल्या ढोबळे यांनी बागेश्वर बाबांचे आशीर्वाद घेऊन आता नेमका कोणता डाव साधतात, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.