#

Advertisement

Saturday, November 25, 2023, November 25, 2023 WIB
Last Updated 2023-11-25T12:29:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले पायलट, ‘तेजस’मधून घेतली भरारी

Advertisement


नवी दिल्ली : 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फायटेर प्लेन 'तेजस'मधून भरारी घेतली. यापूर्वी राष्ट्रपती राहिलेले डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू यांनी सुखोई विमानातून भरारी घेतली होती. पंतप्रधान म्हणून फायटर प्लेनमधून भरारी घेणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान बनले आहे.
 कर्नाटकमधील बंगळूर येथील येलहंका एयरबेसमधून त्यांनी तेजस विमान उडवले. फायटेर प्लेनमधून उड्डन करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. तेजस हे भारताचे ‘मेक इन इंडिया’ फायटर जेट विमान आहे. तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) केली आहे. तेजस हे सिंगल इंजिन असणार विमान आहे. तेजस विमानाच्या दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत.
तेजसचे इंजिन आता भारतात तयार होणार आहे. LCA MARK 2 (तेजस एमके 2) आणि स्वदेशी एडवांस्ड मीडियम कॉम्बैट एयरक्राफ्ट (AMCA) पहिल्या दोन स्क्वॉड्रनचे इंजिन भारतात तयार होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत मल्टी-रोल फायटर जेटला मंजुरी दिली आहे. भारतीय संरक्षण दल आत्मनिर्भर करण्याकडे हे महत्वाचे पाऊल आहे. आतापर्यंत भारत संरक्षण साहित्य विदेशातून आयात करत होता. परंतु आता संरक्षण क्षेत्रात भारताने ‘मेक इन इंडिया’ला सुरुवात केली आहे.