#

Advertisement

Monday, November 20, 2023, November 20, 2023 WIB
Last Updated 2023-11-20T11:12:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

कसिनोच्या फोटोवर बावनकुळेंचे स्पष्टीकरण..

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'लाव रे तो व्हिडीओ' नाट्य सुरु आहे. एकमेकांचे वादग्रस्त व्हिडीओ, फोटो शेअर करुन खळबळ उडवून दिली जात आहे. फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसिनोमध्ये जुगार खेळताना दिसत आहेत. हा फोटो 19 नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,वेनेशाइन इथला फोटो असल्याचा दावा  शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. आता चंद्रकांत बावनकुळे यांनी फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे.
मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो. तेथील हा परिसर असल्याचे बावनकुळे म्हणाले. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले : राऊत
चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात, असे राऊतांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.