Advertisement
मुंबई : डान्स कार्यक्रमांतून गावोगावी पोहोचणारी गौतमी आता रुपरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिचा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटांची आवड आणि त्याचसोबत गौतमीच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी चांगलीच उस्तुकता लागली आहे. मात्र, एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च दरम्यान गौतमी तिथे उपस्थित राहणार नाही. या चित्रपटाचे चित्रिकरण सोलापूर, हंपीसह परदेशात झालं आहे. बाबा गायकवाड दिग्दर्शत या चित्रपटात लोककलावंतांच्या आयुष्य दाखविण्यात आलं आहे. डान्सनं सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी गौतमी आता बॉक्स ऑफिसवर देखील राज्य करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खरंतर हा चित्रपट गौतमीसाठी खूप खास आहे. या चित्रपटात लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.