#

Advertisement

Friday, December 1, 2023, December 01, 2023 WIB
Last Updated 2023-12-01T11:57:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान

Advertisement

 अजित पवार लोकसभेच्या जागा लढवणार

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूका जाहीर होतील असा अंदाज अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.  तसंच राज्यात लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची मोठी घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. बारामती अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे सामना रंगणाराय.अजित पवार सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून उमेदवार देणार आहेत. अजित पवार गट बारामती लोकसभा लढणार आहे. कर्जतच्या चिंतन शिबिरातून अजित पवार यांनी घोषणा केली. तर उद्धव ठाकरेंच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघांवरही लढण्याबद्दल अजित पवार शिंदेंशी चर्चा करणार आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाव्यतिरिक्त सातारा, शिरुर आणि रायगड या चार जागांवर अजित पवार यांनी दावा सांगितला आहे. इतकंच नाही तर जे मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहेत. पण त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे त्या मतदारसंघातही भजप आणि शिंदे गटाशी चर्चा करुन जागा वाटप करता येईल का याबाबत चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.