Advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल आक्षेपार्ह विधान
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दत्ता दळवी यांना मुलूंड कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने 437अंतर्गत काही अटीस्तव, 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
उद्धव ठाकरे गटातील नेते दत्ता दळवी यांच्या विधानानंतर मोठा वाद पेटला होता. दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दत्ता दळवींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता तेव्हा, 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
पण यानंतरही दत्ता दळवी आपल्या विधानावर ठाम होते. “मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. मी केलेल्या वक्तव्याबद्दल वावगं वाटत नाही. कारण, आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम केलं आहे. आनंद दिघे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात जो शब्द वापरला, तोच मी बोललो आहे,” असं ते म्हणाले होते.