#

Advertisement

Friday, December 1, 2023, December 01, 2023 WIB
Last Updated 2023-12-01T12:24:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तेलंगणात बीआरएसला मोठा धक्का बसण्याची शक्यता

Advertisement

दिल्ली : एक्झीट पोलने वर्तवलेल्या अंदाजानुसार तेलंगणात सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे जाणार असल्याचं दिसतंय. तर भाजपाला केवळ 5 ते 10 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं दिसंतय. सत्तेत असलेल्या बीआरएसलाही इथें मोठा  धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी 2290 उमेदवार निवडणुसीच्या रिंगणात आहेत. आज या जागांसाठी मतदान पार पडलं. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत तेलंगणात बीआरएसची सत्ता होती. पण यावेळी के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला धक्का बसण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत रंगताना दिसत आहे. काही एक्झिटपोलच्यामते काँग्रेसला स्पष्ट बहुमत दाखवण्यात आलं आहे. 

सीएनएक्स 
भाजप – 2-4, काँग्रेस – 63-79, बीआरएस - 31-47,  इतर 03-05 पोलस्टार्ट
पोलस्टार्ट
भाजप – 5-10, काँग्रेस – 49-59, बीआरएस - 48-58,  इतर 06-08
चाणक्य 
भाजप – 6-9, काँग्रेस – 67-78, बीआरएस - 22-31,  इतर 06-07
टाइम्स नाऊ
भाजप – 7, काँग्रेस – 37, बीआरएस - 66,  इतर 9
सीएनएन
भाजप – 10, काँग्रेस – 56, बीआरएस - 48,  इतर 5
रिपब्लिंक-जन की बात
भाजप – 7-13, काँग्रेस – 48-64, बीआरएस - 40-55,  इतर  4-7