#

Advertisement

Friday, December 1, 2023, December 01, 2023 WIB
Last Updated 2023-12-02T07:07:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आईची माया.., दाटलेल्या कंठातून "वडील एकच विठ्ठल" माझा..!

Advertisement

 


स्व. अनुराधा ढोबळे यांच्या जयंती धार्मिक सोहळ्यात कन्या ॲड. कोमलताई यांच्या मनोगतातून उपस्थित स्तब्ध 


मंगळवेढा : येथे स्व. अनुराधा लक्ष्मणराव ढोबळे यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राज्य प्रवक्ते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आयोजीत केलेला हा धार्मिक सोहळा घरगुती असला तरी मंगळवेढा मतदार संघ तसेच सोलापूर जिल्हयातीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. तर हा सोहळा सर्वांच्या लक्षात राहिला तो प्रा. ढोबळे यांच्या कन्या ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांच्या स्वागतपर भाषणाने 'शब्दप्रभू' आपले वडील प्रा. ढोबळे यांचा दाटलेल्या कंठातून 'आदरणीय'  माझे वडील हेच माझे विठ्ठल असल्याचा उल्लेख कोमलताई यांचे आई-वडीलांविषयी असलेले प्रेम विषद करून गेला. एका राजकारण्याची लेक असूनही मंगळवेढ्याच्या मातीशी माणसांशी जपलेले नातं त्यांनी अगदी मोकळेपणाने मांडले. त्यांनी केलेल्या भाषणातील काही सारांश असा....

सर्व महात्म्यांना अभिवादन करून माझे आराध्य प्राध्यापक ढोबळे साहेब, उपस्थितांना मानाचा नमस्कार....खरं तर आज आमच्या मातोश्रीचा वाढदिवस.  हो जयंती ही हयात नसलेल्यांची साजरी केली जाते. आई..., आपल्यात नाही. पण, तिचे अस्तित्व प्रत्येक ठिकाणी जाणवते. आई असतेच अशी रिती होऊनही कणकण उरणारी अगदी धर्मसुत्रांनीही आईचे गुणगाण गायले आहे. आई सारखी सावली नाही, आई सारखे आश्रयस्थान नाही, आई सारखे रक्षण नाही. आई इतके प्रिय कुणीही नाही. आई नावाचे अजब रसायन असते आपल्या घर ती आपल्या पंखाखाली सावरून घेते. घराचे घरपण टिकवते. मला, माझ्या आईचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. मला कवी यशवंत यांच्या कवीतेच्या ओळी आठवतात. ते म्हणतात की, चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गायी, वात्सल्य हे पशुंचे मी रोजरोज पाही, पाहू आंतरात्मा व्याकूळ होई, वात्सल्य माऊलीचे. दुर्भाग्य याविना का आम्हास आई नाही... 

कधी कधी आई नसल्याची जाणीव मला अस्वस्थ करून टाकते. विनोबा भावे म्हणतात, निष्काम कर्मयोगीचे उदाहरण म्हणजे आई. आपल्या जीवनात आईचे मोल अनमोल असते, आपल्यावर तिचे अनंत उपकार असतात. पण, तिच्या या प्रेमाची परतफेड करणे कधीच शक्य नसते. मात्र, आईच्या आठवणी चिरंतन रहाव्यात यासाठी मात्र आपण प्रयत्न करू शकतो. आजचा हा जयंती सोहळा हा आईच्या आठवणींचा उजाळा आहे.

माझ्या आईने पांडुरंगाच्या सावलीत आपल्या संसाराची सुरुवात पंढरपुरातून केली. आणि कर्मयोग बघा तिला जोडीदारपण अध्यात्म आणि साहित्याचा पुजारी मिळाला. माझे आई वडील एकमेकांचे आधार होते. या आधारावरच त्यांनी आम्हा भावंडांच्या आयुष्याची भक्कम इमारत उभारली. शाहू शिक्षण संस्था उभी केली आणि कितीतरी गोरगरिबांच्या झोपडीत आनंदाचा दिवा लावला, अशा आई वडीलांच्या  पोटी आमचा जन्म झाला, हे आम्हा भावंडाचे भाग्यच. आज आमची आई नाही. पण, वाऱ्याचां वेग ओळखू येतो, कारण जो तो येथे अट्टल आहे. साहेब सत्तेचे गजर कितीही असुद्यात आमचे विठ्ठल एकच आमचे वडील आहेत, असे म्हणताच संपुर्ण मंडपात टाळ्यांचा गजर झाला. अनेकांनी हात वर करून ताईंना आपली सहमती दर्शविली. 

कोमलताई म्हणाल्या की, आज आमच्या मातोश्रीच्या जयंतीनिमित्त आयोजीत अनुसंध्या या भक्तीमय कार्यक्रमात आपल्याला हरिभक्त पारायण व्यक्तीचे किर्तन ऐकायला मिळणार आहे. ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राच्या कानाला वेड लावले. विठू माऊलीच्या ठाई आई- वडीलांचे दर्शन घडविणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ते जगदगुरु श्री श्री श्री १००८ कालिदास महाराज महाराज सर्वात श्रेष्ठ महानुभावांचे सानिध्य ज्यांना लाभले आहे, असे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहनीनाथ महाराज औसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करते. ज्या मातीत मी जन्मले, वाढले, शिकले, घडले त्या माझ्या मंगळवेढ्याची हक्काची माणस आज इथ उपस्थित आहेत. हाच आमचा मोठा गोतावळा आहे. या माणसांशी माझा जन्मत:च वेगळा ऋनानुबंध आहे. इथल्या माणसांनी कळत नकळतपणे मला खूप काही दिले आहे. माहेरच्या ओटीत ओंजळ ओंजळीने सुखाचे दान टाकले आहे. ढोबळे कुटुंबाच्या प्रत्येक सुख दुःखात सोबत असणारी,पाठिशी उभी राहणारी हीच आमची माणस आहेत. माझ्या जडणघडणीमध्ये मंगळवेढेकरांचा मोठा वाटा आहे. आज ही सर्व मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांचे मी मनापासून स्वागतकरते तसेच संपूर्ण महाराष्ट्रात बहुजन रयपरिषदेचा आवाज बुलंद करणारे संघटनेचे रणझुंजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेही मनापासून स्वागत करते.