Advertisement
मंगळवेढा : संतांची भूमी असलेल्या मंगळवेढा शहरात महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा दामाजीनगर यांच्या वतीने होत असलेल्या दोन दिवसीय विभागीय साहित्य संमेलनास आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनास पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या रसाळ, खुमासदार आणि साहित्यिक भाषाशैलीतून उपस्थितांचे स्वागत केले.
सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह, कवी, लेखक, पुस्तकप्रेमी, नागरिक देखील सहभागी झाले होते.


