Advertisement
दिल्ली :चार राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांची चर्चा सुरु झाली आहे. राजस्थानमध्ये नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये ही काही जुन्या मुख्यमंत्र्यांसह आणखी काही नावे चर्चेत आहेत.
मध्यप्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
मध्य प्रदेशात सध्या तीन नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये शिवराज सिंह चौहान, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, व्हीडी शर्मा आणि प्रल्हाद पटेल यांच्या नावांचा समावेश आहे.
राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे सिंधिया, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, राज्यवर्धन सिंह राठोड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावांचा विचार केला जात आहे.
छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सरोज पांडे आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.
तेलंगणातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
तेलंगणात मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत बोलायचे झाले तर अनेक नेते दावेदार मानले जात आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार कॅप्टन एन उत्तमकुमार रेड्डी, कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क यांसारख्या नावांचा समावेश आहे.
