Advertisement
दिल्ली : तेलंगणातील 119 जागांचे सुरुवातीचे कलही हाती आले आहेत. या निकालात काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळाल्याचं दिसून आलं आहे. तर सत्ताधारी बीआरएस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. बीआरएसला 50 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला 61 जागा आहेत. विशेष म्हणजे तेलंगणात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सत्ताधारी बीआरएसची तेलंगणात अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. तर काँग्रेसने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या स्वप्नांवर बोळा फिरवत कलांमध्ये बहुमतांचा आकडा मिळवला आहे. चंद्रशेखर राव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र जिंकायला निघाले होते, पण त्यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ आली आहे. तेलंगणाच्या 119 विधानसभा जागांचे कल हाती आले आहेत. या कलांमध्ये मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला 47 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला 62 जागा मिळताना दिसत आहे. भाजपला 5 आणि एमआयएमला 4 जागा मिळताना दिसत आहे.
चंद्रशेखर राव कुठे चुकले?
गेल्या वर्षभरापासून चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात हातपाय रोवायला सुरुवात केली होती. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला होता. महाराष्ट्रातील काही नेत्यांना हाताशी धरून पार्टी बांधण्यास सुरुवात केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून तर त्यांचे महाराष्ट्रातील दौरे अधिकच वाढले होते. तेलंगणाची निवडणूक तोंडावर असतानाही चंद्रशेखर राव यांनी तेलंगणावर फोकस ठेवण्याऐवजी महाराष्ट्रावर सर्वाधिक लक्ष दिलं होतं. तिथेच चंद्रशेखर राव चुकले.
