#

Advertisement

Tuesday, December 5, 2023, December 05, 2023 WIB
Last Updated 2023-12-05T12:30:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एकाच मंचावर बहीण-भाऊ...

Advertisement

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र

बीड : शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्ताने पहिल्यांदाच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र आले. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांची स्तुती केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. यापुढे पंकजाताई आणि मी मिळून बीडचा विकास करणार आहोत, अशी घोषणाच धनंजय मुंडे यांनी केली. धनंजय मुंडे यांच्या घोषणनेनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते.
बीडमध्ये राज्य सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना धनंजय मुंडे यांची स्तुती करतो. मला मीडियाने विचारलं ताई तुम्ही या कार्यक्रमाला आलात हे प्रमुख आकर्षण आहे का? मी म्हटलं, मंचावर सर्व आमदार आहेत. त्यामध्ये माझा संवैधानिक रोल नाही. पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी काम केलं. परळीची सेवा करताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं मनात वाटायचं. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा या कामाचं बीजारोपण केलं. धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते. तीन वर्ष कोविड होतं. सत्तांतर होतं. आता ही योजना पुढे जाईल. अत्यंत चांगलं काम या माध्यमातून झालं पाहिजे. या वैद्यनाथाचा आशीर्वाद आपल्याला लाभला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी धनंजय मुंडे यांनीही जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनीही पंकजा यांचं तोंडभरून कौतुक केलं. जीवनात अनेक सभा केल्या. अनेक कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. व्यासपीठावरील सर्वांना बोलावं असं वाटेल असा हा कार्यक्रम आहे. एवढी गर्दी पाहिल्यावर तोंडातून शब्द फुटू नये इतकी गर्दी आहे. बीड जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला म्हणून ओळखला जाणार नाही. ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही, एवढा आम्ही विकास करू, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.