#

Advertisement

Tuesday, December 5, 2023, December 05, 2023 WIB
Last Updated 2023-12-05T12:21:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून उद्या सुट्टी जाहीर

Advertisement

शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आदेश लागू

मुंबई : शासकीय, निमशासकीय कार्यालयांना उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीर केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही सुट्टी देण्यात आली असल्याचं शासकीय परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. हा आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. शासनाने सुट्टीसंबंधी काढलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी 'अनंत चतुदर्शी'च्या दिवशी आणि 2007 पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्तान मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना तिसरी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.