#

Advertisement

Tuesday, December 19, 2023, December 19, 2023 WIB
Last Updated 2023-12-19T12:31:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राणा दांपत्याला मोठा धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली

Advertisement

हनुमान चालिसा पठण प्रकरण : तुमच्याविरोधात ठोस पुरावे... 

मुंबई : हनुमान चालिसा पठण प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने दोघांविरोधात पुरावे तसंच साक्षीदार असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. राणा दांपत्याने याप्रकरणी दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. आज यावर न्यायालय निर्णय देणार होतं. पण आज कोर्टाने दोघांविरोधात ठोस पुरावे आहेत सांगत याचिका फेटाळून लावली. आता 5 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. राणा दांपत्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसाचं पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर त्यांना 23 एप्रिलला अटक करण्यात आली होती. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याविरोधात कलम 153 अ आणि 135 अंचर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या दोघेही जामीनावर बाहेर आहेत.