#

Advertisement

Tuesday, December 19, 2023, December 19, 2023 WIB
Last Updated 2023-12-19T12:42:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लोकसभेतून सुप्रिया सुळे निलंबित

Advertisement

दिल्ली : संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतून आज 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सोमवारी लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा एकूण 78 खासदारांवर करण्यात आली होती. आतापर्यंत अधिवेशनात एकूण 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

निलंबित खासदारांमध्ये वैद्यलिंगम, गुरजीत औजला, सुप्रिया सुळे, सत्यगिरी, अदूर प्रकाश, मनीष तिवारी, प्रद्युत बोरदोलोई, गिरीधारी यादव, गीता कोरा, फ्रान्सिस सरदेन्हा, जगत्रक्षणम, पार्थिबन, फारुख अब्दुल्ला, ज्योत्स्ना महंत, अ गणेशमूर्ती, गणेशमूर्ति, माला रॉय, अ वेलुस्वामी, चंद्रकुमार, शशी थरुर, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव, दानिश अली, टीएनव्ही सेंथिल कुमार, खैलदूर रहमान, संतोष कुमार, दुलाल चंद्र गोस्वामी, नवनीत बिट्टू, दिनेश यादव यांचा समावेश आहे.