#

Advertisement

Saturday, December 2, 2023, December 02, 2023 WIB
Last Updated 2023-12-02T15:44:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा !

Advertisement

निवृत्त न्यायाधीश श्रीराम करंदीकर यांनी केले आवाहन 

भोसरी :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सुपूर्त केलेल्या संविधानाने समाजातील सर्व घटकांना जगण्याचा समान अधिकार दिला. संविधानामुळे प्रत्येकाला आपली ओळख निर्माण करता आली, त्यामुळे लहान थोरांना संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश श्रीराम करंदीकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा व अनुसुचीत जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने माजी मंत्री तथा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे व भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी - इंद्रायणीनगर येथील पिसीएमसी डेपो जवळ, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज येथे "संविधान दिवस गौरव यात्रा" आयोजित करण्यात आली होती. यावेळी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायाधीश श्रीराम करंदीकर बोलत होते. प्रसंगी, इंद्रायणी नगर बस स्टॉप ते राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजपर्यंत संविधान रॅली काढण्यात आली. मोठ्या घोषणा देत नागरिकांनी रॅलीत सहभाग घेत संविधानाची शपथ घेतली. तसेच, उपस्थित न्यायाधीश व वकील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, भाजपा सरचिटणीस विलास मडिगेरी, अजय पाताडे, संजय - मंगोडेकर, अनुसुचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनराज बिरदा, कायदा सेलचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ, सरचिटणीस गोरख कुंभार, महिला - आघाडी सरचिटणीस प्रियंका रेणुसे, उपाध्यक्ष ऍड. मंजोरे - काथवडे, रीना मगदुम, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ - कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंखे, अॅड. कोमल - ढोबळे - साळुंखे, प्राचार्या शोभा पिल्ले, आस्की कॉम्प्युटर - सेंटरचे संचालक संतोष ओझा, अनिल सोनार, रवी खोकर, अभिजित भोसले, ताहीर शेख, सुमित गायकवाड  यांच्यासह वकील व कायदा प्रशिक्षणार्थी  विद्यार्थी तसेच मंडलाध्यक्ष, कार्यकारणी पदाधिकारी, उपाध्यक्ष, चिटणीस, विविध मोर्चा, प्रकोष्ठ, महिला मोर्चा पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अनुसुचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनराज बिरदा यांनी केले.