#

Advertisement

Saturday, December 2, 2023, December 02, 2023 WIB
Last Updated 2023-12-03T05:13:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा...

Advertisement


पुणे : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या हाती आलेल्या निकालांनुसार तेलंगणा, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र असून, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विधानसभेच्या या निवडणुकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार कोण बोल्ड होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

मध्य प्रदेशात भाजपने अप्रतिम कामगिरी केली आहे. 230 जागांपैकी 144 जागांवर भाजप आघाडीवर असून, काँग्रेस 82 जागांवर पुढे आहे. तर, राजस्थानमध्ये भाजप 115 जागांवर तर, काँग्रेस 72 जागांवर आघाडीवर आहे.

तेलंगणा निवडणूक 2023: काँग्रेस 38, बीआरएस 23 आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थानच्या राजकारणात सत्ताबदलाची परंपरा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळते. यावेळी विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कुंडलीचा विचार करता याची शक्यता कमी दिसते. जन्मकुंडलीनुसार या दिवसांत देवगुरू गुरूची विशेष कृपा आहे. गोचरच्या गुरूची सकारात्मक उर्जेचा प्रवाह कायम सुरु आहे. याशिवाय राहूच्या महादशामध्ये गुरूची अंतरदशाही कायम दिसून येते.