#

Advertisement

Sunday, December 3, 2023, December 03, 2023 WIB
Last Updated 2023-12-03T12:45:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रातही भाजपची एकहाती सत्ता येईल, माझा असा ठाम विश्‍वास

Advertisement

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची प्रतिक्रिया 

पुणे : देशात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभेत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येत या राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आली आहे, आगामी 2024 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा तसेच विधनसभेत चांगले यश मिळून भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल, असा ठाम विश्‍वास आहे. कारण, देशासाठी नरेंद्र मोदी यांच्या रूपात एक भक्कम नेतृत्त्व लाभले आहे, नागरिकांना आता ते गमवायचे नाही, अशी प्रतिक्रिया बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली आहे.  

विधानसा निवडणुकीत तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष केला. भोसरी येथे वुमन्स लॉ कॉजेजच्या प्रांगणातही आनंदोत्सव झाला. यापार्श्‍वभूमीवर अ‍ॅड. कोमलताई यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, 2024 लोकसभा निवडणुकीआधीची सेमी-फायनल म्हणून या राज्यांतील निवडणुकांकडे पाहिले जात होते. या निकालात भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. या चांगले पडसाद आता महाराष्ट्रात होणार्‍या निवडणुकांतही उमटतील. एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात तीन राज्यांत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. मोदी जी आणि अमित शाह साहेब आणि जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतेे, असे अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.