#

Advertisement

Tuesday, December 5, 2023, December 05, 2023 WIB
Last Updated 2023-12-05T12:17:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले

Advertisement

'शिवतीर्थ'मध्ये घडला प्रकार 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. पदवीधर निवडणूक आढावा बैठकीमध्ये राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. वारंवार बैठकी होऊ सुद्धा पदवीधर मतदारांची नोंदणी का होत नाही? असा सवाल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारला.
मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवतीर्थवर पार पडली. या बैठकीला वॉर्ड अधिकाऱ्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वचजण उपस्थित होते. लोकसभा मतदारसंघानुसार या बैठकींचं आयोजन केलं जात आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पदावीधर मतदारांच्या नोंदणीचा विषय चर्चेत आला. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करुन घ्यावी. त्यासंदर्भातील टार्गेट पदाधिकाऱ्यांना आधीच्या बैठकींमध्ये देण्यात आलं होतं. मात्र जेवढं टार्गेट निश्चित करुन देण्यात आलेलं ते पूर्ण झालं नाही. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले.