#

Advertisement

Tuesday, December 5, 2023, December 05, 2023 WIB
Last Updated 2023-12-05T11:58:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भिडे वाडा पाडला, आनंद झाला! स्मारक उभारावे.. दिल्लीतही अ‍ॅड. कोमलताई यांनी जाहीरपणे मांडले होते मत...

Advertisement


पुणे : नवी दिल्ली येथे लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साहित्य, शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना यावर्षी ता. 4 जानेवारी 2023ला सावित्री कन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वंचीत समाजातील मुले-मुलींसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचाही सन्मान या पुरस्काराने करण्यात आला होता. त्यावेळी केेलेल्या मनोगतात त्यांनी पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांचे स्मारक तातडीने होण्याबाबत तसेच याकामी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे तसेच वाड्यातील भाडेकरूंमुळे स्मारकाच्या कामात अडथळा येत असल्याबाबत जाहीरपणे खंत व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने न्यायालयीन आदेशानुसार सोमवारी (ता.5) रात्रीच भिडेवाडा जमीनदोस्त केल्यानंतर अ‍ॅड. कोमलताई यांनी महापालिका प्रशासनाचे तसेच न्याय व्यवस्थेचे आभार व्यक्त केले. परंतु, आता स्मारकाच्या कामाला उशीर नको, अशीही मागणी केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, के.जी.मार्ग, नवे महाराष्ट्र सदन येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात अ‍ॅड. कोमलताई यांनी सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुलें यांच्या विद्यार्थिनी देशातील पहिल्या निबंधकार, बहुजन शिक्षिका, सत्यशोधक मुक्ता साळवे यांच्याविषयी मनोगत व्यक्त करीत वंचीत-बहुजन समाजातील विद्यार्थिंनीचे शिक्षणाबाबतचे वास्तव मांडून संपूर्ण नवे महाराष्ट्र सदन हेलावून सोडले होते. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी अनेक संघर्षातून पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या याच शाळेत मातंग समाजातील मुक्ता शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे सांगून आज भिडे वाड्याच्या जागी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात तेथील भाडेकरून आणि दुकानदार अडचणी आणत असल्याबाबत खंत व्यक्त केली होती. पुण्यातील हा वाडा पाडून त्या ठिकाणी फुले दाम्पत्याचे स्मारक उभे करण्याचे पुणे महापालिकेचे नियोजन असताना तब्बल 13 वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत वेळ गेला. त्यामुळे याबाबत न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी तसेच पुणे महापालिकेनेही तसे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत दिल्लीतील व्यासपीठावरून जाहीरपणे मांडले होतेे. आज, बरोबर 12 महिन्यांनी (ता.5 डिसेंबर) भिडे वाडा प्रकरणी प्रत्यक्षात कारवाई झाली. याबाबत अ‍ॅड. कोमलताई यांनी मोठे समाधान व्यक्त केले.