#

Advertisement

Tuesday, December 5, 2023, December 05, 2023 WIB
Last Updated 2023-12-05T12:13:08Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार?

Advertisement

भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

भंडारा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी एक मोठं विधान केलंय. 2024 ला फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान करताना ठाकरेंवरही निशाणा साधला. फडणवीस हेच एकमेव वाघ आहेत, त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही वाघ राज्यात असूच शकत नाहीत असा टोला बावनकुळेंनी लगावला. भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथं भाजपकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला तिथे चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सुतोवाच केलं. जेव्हा-जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विषय येतो, तेव्हा एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतं. मात्र भंडा-यात बावनकुळेंनी थेट फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं विधान केल्यानं शिंदे गटाची धडधड वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.