#

Advertisement

Tuesday, December 26, 2023, December 26, 2023 WIB
Last Updated 2023-12-26T12:45:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्रकाश आंबेडकर यांचं धक्कातंत्र : मतदारसंघात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत

Advertisement

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत. लोकसभेच्या जागावाटपासाठी सत्ताधारी दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याची माहिती ताजी असताना आता विरोधी पक्षांमध्येही तशा अनेक घडामोडी घडत असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या तीनही पक्षांमध्ये खलबतं सुरु आहेत. असं असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या धक्कातंत्राचं अस्त्र उगारण्यास सुरुवात केली आहे.
वंचित बहुजन आघाडी पक्षाला महाविकास आघाडीत सहभागी करुन घ्यावं, अशी शिवसेना ठाकरे गटाची भूमिका आहे. पण महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांकडून हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता थेट लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. त्याचसाठी वंचित बहुजन आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.वंचित बहुजन आघाडीची आज राज्य कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत 2019 निवडणुकीतील टक्केवारी आणि 2024 च्या निवडणुकीत कोणकोणते उमेदवार उभे करायचे, यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.