#

Advertisement

Tuesday, December 26, 2023, December 26, 2023 WIB
Last Updated 2023-12-26T12:50:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजू शेट्टी यांचा स्वबळाचा नारा

Advertisement


लोकसभेच्या या सहा जागा लढणार 
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. देश पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य पातळीवर स्थानिक पक्षांनी मित्र पक्षांशी चर्चा सुरु केली आहे. स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. आम्हाला महायुती आणि महाआघाडीचाही अनुभव वाईट आहे. यामुळे लोकसभा जागावाटप चर्चेमध्ये आम्ही फारसे लक्ष दिलेले नाही. आम्ही सहा जागांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांनी हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही या जागा लढवणार आहोत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाच आम्ही या आघाडीमधून बाहेर पडलो. मात्र बाहेर पडल्यानंतर तुम्ही का बाहेर पडला याची विचार नाही कोणी केला नाही. त्यानंतर आता देखील आमच्याशी कोणी संपर्क साधलेला नाही. आम्ही पुन्हा महाविकास आघाडी सोबत गेलो होतो. त्यांच्या धोरणावर आक्षेप ठेवून बाहेर पडलो होतो. त्याचे काय याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. आम्ही जे आक्षेप नोंदवले, त्याचा खुलासाच होणार नसेल तर तिकडे जाऊन तरी काय उपयोग? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.