#

Advertisement

Tuesday, December 26, 2023, December 26, 2023 WIB
Last Updated 2023-12-26T12:28:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपाच्या अडचणी निवडणुकांआधीच वाढणार?

Advertisement

मुंबई : लोकसभेच्या जागावाटपावरुन चर्चांना उधाण आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गट हा शिंदे गटाबरोबर भाजपाबरोबर सत्तेत आहे. त्यामुळेच आता लोकसभेला जागावाटपामध्ये जितका वाटा शिंदे गटाला मिळेल तितकाच वाटा आपल्यालाही हवा अशी अजित पवार गटातील पदाधिकारी आणि खासदारांची मागणी असल्याचं समजतं. जागा वाटपामध्ये शिंदे गटप्रमाणेच समसमान जागा वाटप करण्यात यावं अशी अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सत्तेत आहेत.
आपला गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाचे प्रमुख असलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आज म्हणजेच 26 डिसेंबर रोजी मुंबईमधील 'देवगिरी' निवासस्थानी आमदार, खासदारांची बैठक पार पडणार आहे. तसेच सायंकाळी या ठिकाणी नियमितप्रमाणे होते तशी आमदारांची बैठकही पार पडणार असून त्यामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होईल असं मानलं जात आहे.