Advertisement
आमदार झाल्यानंतर साहेबांचा सत्कार करतानाचे बोलके छायाचित्र
ब्रम्हपुरी : मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून 1985 मध्ये लक्ष्मणराव ढोबळे हे निवडून आले होते. त्यावेळी प्रथमच ब्रह्मपुरी गावात सरांचे निकटवर्तीय एकनिष्ठ कार्यकर्ते विलास धर्मा पाराध्ये यांनी आमदार झालेले लक्ष्मणराव ढोबळे यांचा जाहीर सत्कार केला होता, त्यावेळी घेतलेले एक दुर्मिळ छायाचित्र आज समोर आले आहे. सध्या भाजपचे राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी लक्ष्मणराव ढोबळे सांभाळत आहेत. याबाबत अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या खास आठवणी विषयी सांगितले की, मा. धनंजय दादासो पाटील, मा.शरद पुजारी, अशोक पाटील, राजाभाऊ गुरुजी हे त्या क्षणाचे साक्षिदार ठरले आहेत. त्यावेळी विलास काकांचे वय साधारण 21 वर्षे असेल तेंव्हापासून विलास काका हे एकनिष्ठ राहिले आहेत, त्यांना नुकताच मताचा अधिकार प्राप्त झाला होता. माझे पहिले मत मी सरांनाच केले असल्याचे ते आजही सांगतात. आज साहेबांच्या मार्गदर्शनातून ते समाजात सक्रिय कार्यकर्ते आहेत. युवकांना मार्गदर्शन करताना दिसतात विविध सामाजिक उपक्रम घेऊन समाज प्रबोधन करणे,असे त्यांचे कार्य सुरू असते. गरीब, वयस्कर मंडळींना सरकारी लाभ मिळून आर्थिक मदत कशी देता येईल, याविषयी ते तत्पर असतात. समाजात अनेक युवकांचे संघटन त्यांनी केले आहे. प्रबोधन, मार्गदर्शन याविषयीची त्यांची धडपड आजही सुरूच आहे. ढोबळे साहेबांच्या माध्यमातून इयत्ता पहिली शिकलेला हा माणूस दिल्ली, मुंबई, मंत्रालय, विधान भवन, राष्ट्रपती भवन, संसद भवन फिरून देशाचा कारभार कसा चालतो हे पाहून आलेला आहे, त्याच प्रेरणेने समाजात साहेबांचे निकटवर्तीय एकनिष्ठ राहिले त्यामुळेच त्यांचे हे जुने छायाचित्र एकनिष्ठ तत्वाची महती सांगते, असे अॅड. कोमलताई यांनी आवर्जुन सांगितले.
