Advertisement
अमरावती : नवनीत राणा पुढच्या 6 महिन्यांमध्ये जेलमध्ये दिसतील, नवीनत राणा मुलुंड कोर्टात घिरट्या घालत आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना आमदार रवी राणा यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा दावा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रवी राणा यांनी तुमचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. आता या निवडणुकीतही तुम्ही पाठिंबा देणार का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला. म्हणूनच रवी राणाची मिसेस कोर्टात घिरट्या घालत आहे, सहा महिन्यांमध्ये ती जेलमध्ये दिसेल, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
