#

Advertisement

Saturday, January 6, 2024, January 06, 2024 WIB
Last Updated 2024-01-06T11:53:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल

Advertisement

पोलिसाला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल
पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांच्या दादागिरीचा प्रकार पुणे शहरात शुक्रवारी पुन्हा घडला. ससून रुग्णालयातील कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर व्यासपीठावरुन उतरल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांमध्ये बातम्या आल्या. विरोधकांनी टीका केली.ं त्यानंतर अखेर सुनील कांबळे यांच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजप आमदार सुनील कांबळे यांना पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भोवले. सुनील कांबळे यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या आणि विरोधकांकडून सुरु झालेल्या टीकेनंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या कार्यक्रमात आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी शिवाजी सरक असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.