#

Advertisement

Friday, January 5, 2024, January 05, 2024 WIB
Last Updated 2024-01-05T13:07:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

‘बार्टी’ च्या गैरकारभाराची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार

Advertisement

बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची माहिती 

पुणे : भीमा कोरेगावला येणार्‍या लोकांसाठी जेवणावळी नको, तेथे जेवणासाठी कोणाही जात नाही, जेवणावळीच्या नावाखाली निधी खाण्याचा प्रकार सुरू आहे का? ‘बार्टी’चा पैसा संशोधन आणि प्रशिक्षणासाठी वापरावा, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. कोमलताई यांनी सांगितले.
यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेेत महिलाध्यक्षा अ‍ॅड. शुभा पिल्ले तसेच सरचिटणीस ईश्‍वर क्षिरसागर आदी उपस्थित होते. भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून, देशभरातील अनुयायी भीमा कोरेगाव येथे येतात. या ठिकाणी बार्टीच्या वतीने जेवणावळीवर लाखो रूपयांचा निधी खर्च करण्यात येतो. वंचीतांच्या शिक्षणासाठी, उत्कर्षासाठी सदर निधी खर्च करणे अपेक्षित असताना बार्टीकडून निधीची अशी उधळण होत आहे. त्यामुळे बार्टीला आमचे सांगणे आहे की, स्मृतीस्थळास वंदन करण्यासाठी अनुयायी बांधव-भगिनी येत असतात, यामागील भावना वेगळी असते. कोणीही तेथे जेवण करण्यासाठी जात नाही. याशिवाय विविध समाज संस्थांच्या माध्यमातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सेवाभावनेतून विविध सेवा उपलब्ध करून दिलेल्या असतात, अशावेळी जेवणावळीच्या नावाखाली निधी खाण्याचा प्रकार बार्टीकडून सुरू असल्याचा आरोपही अनेक कार्यकर्ते करीत आहेत.  बार्टीचा निधी हा विद्यार्थ्यांसाठी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी खर्च होणे अपेक्षित आहे, तो इतर कुठल्याही कारणासाठी खर्च करू नये, अशी आमची मागणी आहे.
बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अनेकदा फेलोशीपसाठी आंदोलन करण्यात येते. दोन-दोन, तीन-तीन महिने विद्यार्थी आंदोलनाला बसलेले असतात अशावेळी आमच्याकडे निधीच नाही, असे बार्टीचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी असलेली ही संस्था विद्यार्थ्यांना निधी नाही, असे कसे काय सांगू शकते? तर, यालउट जेवणावळीवर उधळण करण्यासाठी बार्टीकडे निधी कोठून येतो, अशी टीकाही अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली.