#

Advertisement

Saturday, January 6, 2024, January 06, 2024 WIB
Last Updated 2024-01-06T12:12:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मी अजून 8 महिने मुख्यमंत्री…

Advertisement

ठाणे : वरळी, पालघर, भिवंडी या भागातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महत्वपूर्ण विधान केलं. मी अजून 8 महिने आहे. म्हणून आपल्याला फिरावं लागणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
वरळी आणि पालघर मधून अनेक जणांनी प्रवेश केला आहे. अतिशय कमी वेळात प्रवेश झाला. तुम्ही जो विश्वास दाखवला तो मी पूर्ण करेल. आम्ही राज्यात जो विकास केला. त्यामुळे विश्वासाने तुम्ही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरचा विकास करणार आहेत. पालघर जिल्ह्यातील सगळ्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी काम करतो. मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे. यासाठी आपण वर्सोवा ते विरार आणि विरार ते पालघरपर्यंत रस्ता करणार आहोत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पक्षात प्रवेश केलेल्यांचं स्वागत केलं.
सगळ्यांना रोजगार आणि हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी काम करत आहे. अडीच वर्षांत जर काम थांबले होते ते दीड वर्षात पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रात उद्योग नंबर एकवर करणार आहे. मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.