#

Advertisement

Saturday, January 6, 2024, January 06, 2024 WIB
Last Updated 2024-01-06T12:18:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरकरांसाठी रिंग रोड खुला...

Advertisement

सोलापूर : शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेली डोकेदुखी अखेर कमी होणार आहे. राज्यातील महायुती सरकारने सोलापूरकरांसाठी रिंगरोडचं गिफ्ट दिलं आहे. सोलापूरकरांना नव्या वर्षात 45 किलोमीटरच्या रिंग रोडचं गिफ्ट देण्यात आलं आहे. सोलापूरकरांसाठी रिंग रोड खुला करण्यात आला आहे.
सोलापूरकरांना नव्या रिंगरोडचा कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधांसाठी उपयोग होणार आहे. सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोडची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर या रिंग रोडचं काम सुरू करण्यात आलं होतं.लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम 2022 पासून सुरू होते ते आता पूर्ण झाले आहे. रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. या रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या कॉरिडोरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा 45 किलोमीटरच्या रिंग रोडची निर्मिती करण्यात आली आहे. या रिंगरोडमुळे अनेक फायदे होणार आहेत. एकूण पाच शहरांना हा रिंगरोड जोडला गेला आहे. जिल्ह्यातील केगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी, दोड्डीसह अनेक गावेही या रोडमुळे जोडल्या गेले आहेत.