Advertisement
पुणे : केंद्र सरकार विरोधकांवर धाडी टाकीत असून त्यातून बधले नाहीत तर भाजपाकडे वॉशिंग मशिन आहेच अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रजनी इंदुलकर, स्मिता पाटील आणि विजया पाटील या माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी लांब लांबपर्यंतचा संबंध नसताना त्यांच्यावर रेड झाल्या, त्यामुळे हे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे परदेशात असताना त्यांच्याशी संबंधित बारामती एग्रोवर ईडीच्या धाडी पडल्या यावर सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला न्याय दिला तर बरे आहे. सर्वांनाच माहिती आहे संविधान काय म्हणते, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात अदृश्य शक्ती सगळं करतेय.,त्यामुळे आता ही अदृश्य शक्ती करतंय की संविधान हा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाने घ्यायचा आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
