#

Advertisement

Wednesday, January 24, 2024, January 24, 2024 WIB
Last Updated 2024-01-24T12:28:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार नाही?

Advertisement

शरद पवार गटाचा फायदा प्रणिती शिंदेंना किती होणार याबाबत शंकाच 

सोलापूर : महायुतीत राष्ट्रवादीचे दादा अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी आपला संपूर्ण फोकस आगामी लोकसभा निवडणुकीवर केला आहे. कुठल्याही परिस्थितीत पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचेच (ओरिजनल) उमेदवार निवडून आणायचे आहेत. परंतु, सोलापुरात मात्र राष्ट्रवादी पवार गटाचा उमेदवार नसणार असेच काहीसे संकेत शरद पवार यांनी दिल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याच प्रचार करावा लागणार आहे. मात्र, राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याने याचा फायदा प्रणिती शिंदे यांना किती होईल, याबाबत मात्र शंका व्यक्त केली जात आहे.   
सोलापूर दौर्‍यावर शरद पवार नुकतेच येऊन गेले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने महाविकास आघाडी आणि जागा वाटपावर भाष्य केले. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार का? याबाबत आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत बोलणे झाल्याचे असल्याचे सांगितले तसेच 48 जागांपैकी 35 जागांवर एकमत झाल्याचे व इतर जागांबाबत चर्चा सुरू असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतर शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते, त्यामुळे आगामी लोकसभेला साडू-साडू एकविचाराने लढणार, प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार नसल्याचेच जवळपास स्पष्ट झाल्याची चर्चा साडू-साडू भेटीनंतर आहे.