#

Advertisement

Wednesday, January 24, 2024, January 24, 2024 WIB
Last Updated 2024-01-24T16:27:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर जिल्ह्यात वाढले एक लाख नवे मतदार

Advertisement

महिला मतदारांची संख्या 4386 ने वाढली 

सोलापूर : जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. त्या नोंदणीनंतर जिल्ह्यात 1 लाख 02 हजार 850 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 35 लाख 78 हजार 972 इतकी झाली आहे. सोलापुरात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 4 हजार 386 ने वाढली आहे, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत 18 ते 19 या वयोगटातील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार यादी अद्ययावत करणासाठी पुनर्रिक्षण, तसेच घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले होते. या मोहिमेत जिल्ह्यात 18 ते 19 या वयोगटात 28 हजार 850 मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच, 20 ते 29 या वयोगटात 35 हजार 210 मतदारांची वाढ झाली आहे. या नोंदणीत सोलापूरने राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे.
ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत ३६ लाख ३३ हजार ०७२ एवढे मतदार सोलापूर जिल्ह्यात होते. मात्र, त्यात 72 हजार 806 मयत मतदार होते. ही सर्व नावे वगळ्यात आली आहेत. तसेच एकसारखे फोटो असणारे 60 हजार 967 मतदार होते, त्याची पडताळणी करून तील 15 हजार 363 मतदारांच्या नावे वगळण्यात आली. दोन वेगवेगळ्या मतदारसंघात एकसारखी असणारी अशी 3 हजार165 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण १ लाख ५६ हजार ९५० नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. गेल्या वर्षीच्या प्रारूप यादीतून १ लाख ५६ हजार ९५० मतदार वगळल्यानंतर आणि नवी मतदारसंघ त्या समाविष्ट केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची एकूस संख्या 35 लाख 78 हजार 972 वर जात आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात 49 हजार 220 पुरुष मतदार, 53 हजार 606 स्त्री मतदार आणि 24 तृतीयपंथी मतदारांची वाढ झाली आहे. पुरुष आणि महिला गुणोत्तरही 923 वरून 931 इतके वाढले आहे.