Advertisement
मुंबई : देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं अर्थात अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. तब्बल 22 किमीच्या या सागरी सेतूवरून आता मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आला आहे.
देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं अर्थात अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. तब्बल 22 किमीच्या या सागरी सेतूवरून आता मुंबई ते नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांवर आला आहे. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल उपस्थित होते. यावेळी अभियंत्यांनी या सेतूबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली.
ठाकरे गटाने या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार
निमंत्रण पत्रिकेत ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांचं नाव नाही. ठाकरे गटाला ऐनवेळी निमंत्रण दिल्याने ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, सचिन अहीर हे या भागातील स्थानिक आमदार, खासदार आहेत. यामधील काही जणांना काल रात्री तर काही जणांना आज सकाळी निमंत्रण पत्रिका मिळाल्याची माहिती आहे. मात्र, ठाकरे गट मोदींच्या कार्यक्रमाला या पैकी कोणीही गेले नाही.
