#

Advertisement

Friday, January 12, 2024, January 12, 2024 WIB
Last Updated 2024-01-12T11:57:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पीएमो मोदींकडून काळाराम मंदिरात स्वच्छतेची सेवा

Advertisement

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदींनी रोड शोनंतर गोदावरी तीरावर असलेल्या रामकुंडावर जलपूजन केलं..मोदींनी रामकुंडावर जलपूजन केल्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं...मोदींच्या या दौ-यादरम्यान जय श्री रामच्या घोषणांनी नाशिक दुमदुमून गेलं. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 दिवसांचे अनुष्ठान सुरु केलं.. नाशिकच्या काळाराम मंदिरातून त्यांनी या अनुष्ठानाला सुरुवात केली. प्राणप्रतिष्ठे आधी मोदी 11 दिवस उपवास करणार आहेत. तसंच अष्टांग योगातील 'यम' नियमांचे पालन करणार आहेत.
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक शहरातील पंचवटीतल्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली. मोदी यांनी काळाराम मंदिरात स्वच्छता केली. यावेळी त्यांनी स्वतः मंदिराचो स्वछता केली. पीएम मोदी यांनी काळाराम मंदिरात श्रीरामाचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा आणि आरती देखील करण्यात आली. काळाराम मंदिर हे नाशिकच्या पंचवटीमध्ये आहे.श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर पीएम मोदी यांनी काळाराम मंदिर परिसरात स्वच्छता केली.  स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर परिसरात बादली आणि मॉबने स्वच्छतेची सेवा केली.राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरात आणि तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता अभियान चालवा आणि श्रमदान करा असं आवाहन पीएम मोदींनी केलं.पंतप्रधान मोदींनी रामकुंडावर जलपूजन केल्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतलं...यावेळी मोदींनी मंदिरात आरती केली...दर्शनानंतर मोदी भजनात तल्लीन झाले. यावेळी मोदींनी टाळ वाजवून श्रीरामाचं भजन गायलं.